गिरीशभाऊंची विकासाची स्वप्ने, पूर्ण करण्याचे वचन हेमंतभाऊंचे!

गिरीशभाऊंची विकासाची स्वप्ने, पूर्ण करण्याचे वचन हेमंतभाऊंचे!

Hemant Rasane | कसबा विधानसभा मतदार संघाच्या प्रचंड विकासाचे स्वप्न दिवंगत आमदार गिरीश बापट यांनी पाहिले. ही सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचे आश्वासन आणि वचन कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांनी दिले आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून भाजपा आणि महायुतीचे उमेदवार म्हणून हेमंत रासने (Hemant Rasane) हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या सर्व ठिकाणी पदयात्रा निघत असून ज्येष्ठ, बुजूर्ग आणि प्रख्यात व्यक्तिमत्त्वांना घरोघरी जाऊन ते भेटत आहेत.

या गाठीभेटींमध्ये विकसित आणि सुरक्षित कसबा मतदार संघाबाबतचा दृष्टिकोन हेमंत रासने नमूद करीत आहेत. स्व. गिरीशभाऊ आणि स्व. मुक्ताताई यांचा विकास कामाचा वारसा आपण असाच पुढे चालू ठेवण्याचे आश्वासन हेमंत देत आहेत, आणि ते मतदारांना भावतही आहे.

स्व. गिरीशभाऊ हे 1995 मध्ये निवडून आल्यानंतर या मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न होते आणि अशा नागरी समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला. नागरिकांच्या समस्या या छोट्या छोट्या होत्या. मात्र त्या सोडवणे अत्यंत आवश्यक होते. त्यामध्ये प्रामुख्याने या मतदारसंघात अनेक जुने वाडे होते, त्यांच्या पुनर्विकासासाठी अनेक महत्त्वाचे अडथळे होते. त्याचप्रमाणे, मतदार संघातील अन्य समस्या म्हणजे ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, शौचालये, रस्ते यावरही गिरीशभाऊंनी भर दिला होता. त्यातील प्रलंबित प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याची ग्वाही हेमंतभाऊ यांनी दिली आहे,

त्यानंतर या समस्यांच्या सोडवणुकीसाठी स्व. गिरीशभाऊ यांच्याबरोबरच भाजपानेही मोठे प्रयत्न केले. दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा या समस्या सोडवण्याने नागरिकांची जीवन आता सुसह्य आणि सुखकर झाले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समस्या सोडवण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात येत असताना या मतदारसंघात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची समस्या सुद्धा मोठी होती आणि ती लक्षात घेऊन खासगी जागेत आरोग्य विषयक कामे करण्यासाठी स्व. गिरीशभाऊंनी 2003 मध्ये सरकारकडून निधी मिळवला. पण, त्याला सध्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यावर स्थगिती आली. एवढेच काय, ती तशीच दोन वर्षे कायम राहिली.

यानंतर वाड्यात बाथरूम तयार करणे, बाथरूमची दरवाजा व्यवस्था दुरुस्ती, ड्रेनेज लाईन तयार करणे यासाठी हा निधी वापरला गेला. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य अधिक सुखकर आणि सुसह्य झाले. कसबा पेठ मतदार संघातील वाडे आणि त्यातील रहिवासी यांचे प्रश्न सुटत चालले असल्यामुळे सर्वत्र भारतीय जनता पार्टीला आणि तिच्या प्रतिनिधींना या मतदारसंघात मानाचे स्थान दिले गेले आहे. त्यातच आता प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन हेमंत रासने दिल्यामुळे नागरिक भाजपाला कौल देण्याच्या मन:स्थितीत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

कोथरूडच्या सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांतदादा पाटील

भाजपा युती सरकारच्या काळात सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचारातही वाढ | Sharad Pawar

राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे : Avinash Dharmadhikari

Previous Post
कोथरूडच्या सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांतदादा पाटील

कोथरूडच्या सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांतदादा पाटील

Next Post
मीनाताई ठाकरे वसाहतीतील रहिवाशांना मिळणार एसआरए अंतर्गत पक्की घरे आमदार माधुरी मिसाळ यांची माहिती

मीनाताई ठाकरे वसाहतीतील रहिवाशांना मिळणार एसआरए अंतर्गत पक्की घरे आमदार माधुरी मिसाळ यांची माहिती

Related Posts
indurikar maharaj

‘कोरोनाची तिसरी लाट ही फक्त…’ , इंदुरीकर महाराजांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान

लातूर : सध्या संपूर्ण जग पुन्हा एकदा करोनाच्या संकटाचा सामना करत असून नव्या आव्हानांचा सामना करत आहे. देशात…
Read More
Chandrakant Patil | “मी पालकमंत्री असताना अशा चिंताजनक घटना घडल्या नाहीत”, चंद्रकांतदादांचा रोख कुणाकडे?

Chandrakant Patil | “मी पालकमंत्री असताना अशा चिंताजनक घटना घडल्या नाहीत”, चंद्रकांतदादांचा रोख कुणाकडे?

Chandrakant Patil | पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये एक अल्पवयीन मुलगा अमली पदार्थांचं सेवन करत असतानाचा व्हिडिओ…
Read More
राष्ट्रीय हॅकाथॉन स्पर्धेचे पुण्यात आयोजन

राष्ट्रीय हॅकाथॉन स्पर्धेचे पुण्यात आयोजन

National Hackathon Competition in Pune:- विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि नाविन्यपूर्णतेला वाव देणारी हॅकाथॉन स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.…
Read More