‘नागरिकांनी सर्व सामान्यांची कामे करणाऱ्या शिवसेनेला पालिकेवर भगवा फडकवण्याची संधी द्यावी’

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपा ने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. राज्यात देखील शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही. यामुळे नागरिकांनी सर्व सामान्यांची कामे करणाऱ्या शिवसेना पक्षाला यावेळी पालिकेवर भगवा फडकवण्याची संधी द्यावी असे विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोर्हे यांनी सांगितले.

बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे शिवसेनेच्या वतीने उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांच्या माध्यमातून दोन हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर , संपर्क प्रमुख सचिन अहिर, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, शहर प्रमुख गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, शिवाजी बांगर, संतोष मोहोळ, ज्योती चांदेरे , युवा सेनेचे राज्य सरचिटणीस किरण साळी, संजय बांगर ,संतोष तोंडे, महेश सुतार आदी उपस्थित होते.

यावेळी रवींद्र मिर्लेकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांमध्ये कुटुंब प्रमुखाची भूमिका पार पाडली आहे त्याच प्रमाणे पुण्यात देखील शिवसेनेचे कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिकांना मदत करत कुटुंब प्रमुखाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत.संपर्कप्रमुख सचिन आहिर म्हणाले, मुंबई प्रमाणे पुणे शहरामध्ये देखील शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकवण्यासाठी सर्वसामान्य शिवसैनिकाच्या पाठीशी सर्व नेते उभे आहेत. बाणेर बालेवाडी भागांमध्ये शिवसैनिक जनसेवेच्या माध्यमातून घराघरात पोहोचत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचा आवाज शिवसेना होत आहे.

या कार्यक्रमास बाणेर बालेवाडी म्हाळुंगे विधाते वस्ती परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी धनकुडे यांनी केले तर आभार उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांनी मानले.