मुंबई – शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी आज शिंदे गटावर जोरदार टीका करत केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला आहे. “फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, मग अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत,” असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला.
मीडियाशी संवाद साधताना राऊत ( Sanjay Raut) म्हणाले, “शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर म्हणजे सत्ता हातात असतानाचं नाट्य आहे. उद्या सत्ता नसली, तर त्यांचं संपूर्ण दुकान बंद होईल. आम्ही सत्तेत असताना कधीही इतक्या सूडबुद्धीने कारभार केला नाही. आज ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना झुकवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण जर तीच यंत्रणा दोन तास आमच्या हातात आली, तर भाजपचेच नेते कलानगरच्या दारात रांगेत उभे राहतील,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
राऊत यांनी राज्यातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांना इशारा देत सांगितले की, “सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. आम्हीही सत्ता भोगली आहे, पण एवढ्या विकृत पद्धतीने कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही.” त्यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजप आणि शिंदे गट यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
२०१९ पूर्वीच्या गाड्यांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक; ३१ मार्चची अंतिम मुदत
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, ‘शीशमहल’ प्रकरणी CVC चे चौकशीचे आदेश