Raj Thackeray | मराठीला अभिजात दर्जा द्या; राज ठाकरेंच्या मोदींकडून 5 मागण्या, भरसभेत व्यक्त केल्या अपेक्षा

Raj Thackeray | मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी महायुतीची भव्य सभा शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही मागण्या केल्या.

पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे. अनेक वर्षे खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. देशाच्या अभ्यासक्रमामध्ये 125 वर्षे मराठा सामज्र होतं, त्याचा इतिहास शालेय शिक्षणामध्ये असावा. भविष्यातील पिढ्यांना याबाबत माहिती मिळेल, असे राज ठाकरे म्हणाले.

पुढे आपल्या मागण्या सांगताना ते म्हणाले, समुद्रामध्ये छत्रपतींचा पुतळा कधी उभा राहिल माहित नाही. पण शिवछत्रपतींची खरी स्मारके आहेत ती म्हणजे गड किल्ले आहेत. गडकिल्ल्यांना गतवैभव मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. भविष्यातील पिढ्यांना आमचा राजा कोण होता.त्यानं काय इतिहास गाजवला हे त्या गडकिल्ल्यावरुन कळेल, असे मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like