ग्लोबल टीचर डिसले गुरुजी दोन दिवसांत राजीनामा देणार..

ग्लोबल टीचर म्हणून संपूर्ण देशांत गाजलेले रणजित डिसले गुरुजी सध्या वेगळ्या कारणसांठी चर्चेत आहेत. अमेरिकेत पीएचडी मिळवण्यासाठी डिसले गुरुजीनी जिल्हा परिषेद रजा मागितली. जेव्हा त्यांनी रजेचा अर्ज समोर ठेवला तेव्हा त्यांना विचारण्यात आले तुम्ही शाळेसाठी काय केले? पीएचडीसाठी विहित नमुन्यात अर्ज करा असे सांगून त्यांना पुन्हा पाठविण्यात आले. त्या नंतर या प्रकरणाची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. काहीनी गुरुजीना पाठींबा दिला तर काहीनी शिक्षण विभागावर जोरदार टीका केली.

अखेर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात लक्ष घातले. तसे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे. डिसले गुरुजीना विदेशवारी करण्यासाठी रजेचा अर्ज मंजूर करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत. असे देखील असके तरी डीसले गुरुजी यांनी शिक्षण विभागावर अनेक आरोप केले आहेत. मी दिलेला रजेचा अर्ज मागील दीड महिन्यांपासून प्रलंबित आहे. यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून मला त्रास देण्यात आला. पैशाची मागणी देखील करण्यात आली.

असा आरोप डिसले यांनी केला आहे. ज्या व्यवस्थेत आपल्या कामाचा आदर नाही. अशा ठिकाणी काम करण्याची माझी मानसिकता नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मी राजीनामा देण्याच्या विचारात आहे, असे डिसले गुरुजी यांनी स्पष्ट केले आहे.