गोव्यावर कोण करणार राज्य, अपक्षांच्या हातात सत्तेच्या चाव्या ?

पणजी : उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे. याबरोबरच काही पोटनिवडणुकांचीही मतमोजणी आज होणार असून मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतमोजणीत स्पष्ट होणार आहे.

उत्तरप्रदेशसह सर्व देशाचे लक्ष लागलेली निवडणूक म्हणजे गोवाची. गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होत आहे. यंदा विधानसभेच्या सर्व 40 ही जागांची मतमोजणी आज गुरुवारी एकाच वेळी सकाळी 8 वाजता होत असून 301 उमेदवारांचे पुढील 5 वर्षांचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. आयोगाने केलेल्या तयारीवरून दुपारी 12 पूर्वी निकाल जाहीर होणार असून सत्तेची गणिते स्पष्ट होतील. त्यानंतर सत्ता कोणाकडे याचा फैसला होणार आहे.

निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी गेला महिनाभर सुरू ठेवले आहेत. या दोन्ही पक्षाने सत्तेचा दावा केला आहे. आता यासाठीची अंतिम फेऱ्या सुरू आहेत. यासाठी सर्वच राजकिय पक्षाचे वरिष्ठ नेते गोव्यात (Goa) दाखल झाले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचा सत्ता मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू केले असून आपल्या सर्व उमेदवारांना पणजी जवळच्या रिसॉर्टमध्ये बोलवत बैठक घेतली. यासाठी प्रभारी दिनेश गुंडू राव ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम दोन दिवसांपासूनच राज्यात आले आहेत.