‘या’ देशात भारतापेक्षा कमी किंमतीत मिळतं सोनं, जाणून घ्या जगातील सर्वात स्वस्त सोने कुठे उपलब्ध आहे

भारतात सोन्याच्या किमती (Gold Price) सातत्याने वाढत आहेत. आता एक ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठीही खूप पैसे मोजावे लागत आहेत. तुम्ही पाहिलं असेल की, अनेकवेळा लोक पैसे वाचवण्यासाठी भारताबाहेरून सोने खरेदी करतात, पण ते बेकायदेशीरपणे आणताना विमानतळावरही पकडले जातात ही वेगळी गोष्ट आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, भारताबाहेर किती सोने उपलब्ध आहे? आणि लोक कोणत्या कारणासाठी बाहेरून सोने खरेदी करतात? अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला त्या देशांबद्दल सांगत आहोत, जिथे सोन्याचे दर खूपच कमी आहेत. या माहितीनंतर, तुम्ही त्या देशांमध्ये गेल्यास सोनेही खरेदी करू शकता.

स्वस्त सोने कुठे मिळेल?
सर्वात स्वस्त सोने कोठे (Cheapest Gold Price) उपलब्ध आहे? याची माहिती देण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगतो की जगभरात सोन्याचे दर जवळपास समान आहेत. भारतीय चलनानुसार बघितले तर दरात फारसा फरक नसला तरी इतर देशांच्या चलनानुसार सोन्याचे दर कमी होतात. असे मानले जाते की जर तुम्हाला जगातील सर्वात स्वस्त सोने खरेदी करायचे असेल तर तुम्हाला हाँगकाँगला (Hongkong) जावे लागेल. हाँगकाँगमध्ये सोन्याचे दर खूपच कमी मानले जातात आणि येथील सोने स्वस्त मानले जाते. मात्र, भारतीय चलनाशी तुलना केल्यास दरात फारसा फरक दिसत नाही.

उदाहरणार्थ, जर आपण आजची किंमत पाहिली तर, हाँगकाँगमध्ये सोने सुमारे 4835 हाँगकाँग डॉलर प्रति 10 ग्रॅम आहे. जर तुम्ही त्याचे भारतीय चलनात रूपांतर केले तर आजमितीस 4835 हाँगकाँग डॉलर म्हणजे सुमारे 52 हजार रुपये. त्याच वेळी, आज भारतात सोन्याचा दर 58 हजार रुपयांच्या आसपास आहे. अशा स्थितीत सोन्याच्या दरात केवळ सहा हजार रुपयांचा फरक आहे. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असाल तर परदेशातून सोने खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

दुबईचीही हीच अवस्था आहे का?
आम्ही तुम्हाला सांगतो की दुबईला (Dubai) जाणारे भारतीय दुबईतून सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. सोन्याच्या दरात फारसा फरक नसला तरी दुबईतील सोन्याची शुद्धता अधिक मानली जाते. दुबईचे सोने इतर देशांच्या तुलनेत खूप चांगले आहे आणि लोक दुबईतून सोने खरेदी करू इच्छितात याचे एक कारण म्हणजे त्याची शुद्धता हेही अनेक अहवालांमध्ये सांगण्यात आले आहे. याशिवाय सोन्यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या डिझाईनमुळे दुबईतील लोकही सोन्याला पसंती देतात.