‘आता ‘लोकआग्रहास्तव’ १० एकरात ११३ कोटीचे वांगे पिकवण्याचं ‘कार्य’ यांच्या ‘अध्यक्ष’तेखाली सर्वदूर पसरणार’ 

 Mumbai – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (१० जून) पक्षाच्या वर्धापन दिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमावेळी मोठी घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड केली आहे. तसेच राष्ट्रवादीतील इतर नेत्यांवरही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. मात्र अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही.

दरम्यान, आता या निवडीवर प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी याच मुद्द्यावरून खोचक टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, आता ‘लोकआग्रहास्तव’ १० एकरात ११३ कोटीचे वांगे पिकवण्याचं ‘कार्य’ यांच्या ‘अध्यक्ष’तेखाली सर्वदूर पसरणार.… सावधान, जागते रहो! असं पडळकर यांनी म्हटले आहे.