बहुजनांचा बुरखा पांघरुन एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसला आहे – पडळकर 

पुणे  : बहुजनांचा बुरखा पांघरुन एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसला आहे. पन्नास वर्षाचा त्याचा खेळ राज्यातील पोरांना ओळखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर आरोप करताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली. यावेळी पडळकरांनी पवारांचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख मात्र पवारांकडेच होता असं सांगितले जात आहे.

पुण्याच्या कामशेतमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात ते बोलत होते. भाजप आणि आरपीआयने संयुक्तरित्या या महोत्सवाचे आयोजन केलं आहे. यावेळी आरपीआयसह राज्यातील विविध संघटना आणि चळवळी कोणी फोडल्या? असा प्रश्न त्यांनी विचारला. हे काम पन्नास वर्षांपासून बहुजनांचा बुरखा पांघरुन महाराष्ट्रात घुसलेल्या लांडग्याचं असल्याचं पडळकर सुचवत होते.ABP माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.