‘म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा नाही अशी ठाकरे आणि राष्ट्रवादीची अवस्था झालीय’

 सांगली – सांगली जिल्ह्यात (Sangli News) संजय राऊत यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते अधिक होते. ठाकरे आणि राष्ट्रवादी हे एकमेकांना सध्या सांभाळून घेत असल्याचा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी यांची अवस्था  म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा अशी झाल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.

हे लोक आता एकमेकांना सांभाळून घेत आहेत. राज्यातलं राहील बाजूला आणि हे लोक आता देशातली भाषा बोलायला लागलेली आहेत,त्यामुळे त्यांना आता कृपामय या ठिकाणी दाखल करण्याची नितांत गरज आहे असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना लगवला आहे.