राखीच्या प्रेमात आकंठ बुडाला किरण माने? अभिनेत्याकडून प्रेमाची कबुली

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही सध्या बिग बॉस मराठीमुळे (Big Boss Marathi) चर्चेत आहे. ती बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. बिग बॉसच्या घरातही सतत काही-ना-काही कुरापती करत ती चाहत्यांचे लक्ष वेधताना दिसतेय. या दरम्यान आता राखी सावंतवर बिग बॉसच्या घरातील एका अभिनेत्याचं मन जडलंय, अशी चिन्हे दिसत आहेत. राखीचा आधीपासूनच एक प्रियकर असून त्याचे नाव आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) असे आहे. मग तिचा हा नवा प्रियकर कोण आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडतोय.

बिग बॉसच्या घरातील अभिनेता किरण माने (Kiran Mane) याचे हृदय राखीवर आले आहे. किरण माने आणि राखी सावंत यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पुढे आल्यानंतर त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

बिग बॉस मराठीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत किरण माने एका प्लेटवर RK असे इंग्रजीत लिहिताना दिसत आहे. त्याबरोबरच त्याने लाल रंगाच्या नेलपेंटने हार्टही काढला आहे. त्यावेळी अपूर्वा ही प्रिय राखी असे लिहिताय का असे विचारते. त्यावर किरण माने हे मी RK असं लिहितोय, पण ते खरंतर RM असं हवंय म्हणजे ते राखी माने असं होईल. त्याबरोबरच किरण मानेने त्या प्लेटच्या मागे हार्ट शेप काढून राखी आणि किरण असेही लिहिले आहे.

Bigg Boss च्या घरात जमली किरण माने आणि राखी सावंत यांची “Naughty जोडी”!, असे कॅप्शन व्हिडिओला दिले आहे. या पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.