सरकारी योजना : ग्रामीण व शहरी क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार व सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

राज्यात खादी आणि ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामाद्योग मंडळ आणि जिल्हा ग्रामाद्योग केंद्रामार्फत ही योजना राबविण्यात येते.

योजनेचा उद्देश: (Purpose of the Scheme)

•ग्रामीण व शहरी क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार व सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे.
•बेरोजगार तरुण वर्गाला व पारंपारिक कारागिरांना एकत्रित करुन स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे.
•शहराकडे येणाऱ्या बेरोजगार युवकांचे व पारंपारिक कारागिरांचे स्थलांतर थांबविणे.
•ग्रामीण भागातील रोजगार वाढीस मदत.

पात्र लाभार्थी (Eligible Beneficiaries)

•ग्रामीण कारागीर, उद्योजक
•१८६० च्या संस्था नोंदणी कायद्यान्वये नोंदणी झालेल्या संस्था.
•१९६० च्या सहकारी संस्था कायद्यान्वये नोंदणी झालेल्या संस्था.
•स्वयं सहाय्यता गट -बचत गट.

पात्रतेच्या अटी:(Conditions of Eligibility)

•उत्पादन प्रक्रिया असलेल्या प्रकल्पामध्ये प्रकल्प किंमत १० लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास तसेच सेवा उद्योगामध्ये प्रकल्प किंमत ५ लाख रुपये असल्यास किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता ८ वी पास.
•अर्जदाराचे किमान वय १८ वर्ष पूर्ण.
•अर्जदाराने केंद्र-राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
• केवळ नवीन उद्योजक, कारागीर, संस्था व बचत गट या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

आवश्यक कागदपत्रे : (Necessary documents)
आधार कार्ड
जातीचा दाखला
शाळा सोडल्याचा दाखला
पारपत्र आकाराचे छायाचित्र
प्रकल्प अहवाल
लोकसंख्या दाखला

अर्ज करण्याची पद्धत: इच्छुकांनी www.pmegp.in, www.kvic.in या संकेतस्थळावर ऑनपद्धतीने अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी संपर्क: खादी आणि ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, राष्ट्रीयकृत बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा. उद्यमी हेल्प लाईन टोल फ्री क्र.१८००-१८०-६७६३

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय,पुणे