“OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा”

"OTT प्लॅटफॉर्म, स्टँडअप कॉमेडी शोजमधील आक्षेपार्ह मजकुराबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा''

मुंबई (Neelam Gorhe) | ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी शोजमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह, अयोग्य आणि संवेदनशील टिप्पण्या करण्यात येतात. त्यामुळे संबंधित व्यक्ती आणि समाजघटकांविषयी अनादराची भावना निर्माण होते. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला भाषण स्वातंत्र्य दिले आहे, मात्र त्याचा गैरवापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा अन्य व्यक्ती अथवा समाजघटकाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी होऊ नये.”

सध्या रंगभूमीवरील प्रयोगांसाठी रंगभूमी परीक्षण मंडळ आहे, तर चित्रपटांसाठी सेन्सॉर बोर्ड कार्यरत आहे. मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि स्टँडअप कॉमेडी शोजवर कोणतेही प्रभावी नियमन नाही. त्यामुळे त्यावर प्रदर्शित होणाऱ्या सामग्रीवर कोणतेही बंधन नाही. “या माध्यमांवर होणाऱ्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे योग्य ती आचारसंहिता तयार करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

लोकसभेतही शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी यासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. ओटीटी आणि स्टँडअप कॉमेडी शोजवर नियंत्रण आणण्यासाठी कायदेशीर चौकट ठरवावी, अशी मागणी त्यांनी संसदेत केली होती. डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, राज्य शासनाने या विषयावर गांभीर्याने विचार करावा आणि योग्य ती आचारसंहिता लवकरात लवकर लागू करावी.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

कोणी अजित पवारांच्या वाटेला का जात नाही? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

ईदचं निमित्त साधून ‘सौगात-ए-मोदी’द्वारे भाजप ३२ लाख मुस्लिम कुटुंबांना भेट देणार

शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर, पण फक्त ४ जागांमुळे तुटली होती भाजपसोबतची युती

Previous Post
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर; शिवप्रेमींच्या मागणीला तत्काळ मंजुरी

पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर; शिवप्रेमींच्या मागणीला तत्काळ मंजुरी

Next Post
खासगी विकासक व ट्रस्टमधील करार सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

खासगी विकासक व ट्रस्टमधील करार सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

Related Posts
पुष्कर सिंह पेशवांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधी ठिकाणी यंदाचा दीपोत्सव

पुष्कर सिंह पेशवांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधी ठिकाणी यंदाचा दीपोत्सव

Nanasaheb Peshwa | पाञ्चजन्य फाउंडेशन ही संस्था गेल्या काही वर्षांपासून इतर सामाजिक उपक्रमांसोबत पूना हॉस्पिटल समोर नदीपात्रातील श्रीमंत…
Read More
विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ( Maharashtra Legislative Council) भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे.…
Read More
शरद पवारांनी नेहमी भुजबळांना तळहाताच्या फोडाप्रमाणं साभाळलं; आव्हाडांचा अजित पवारांना टोला

शरद पवारांनी नेहमी भुजबळांना तळहाताच्या फोडाप्रमाणं साभाळलं; आव्हाडांचा अजित पवारांना टोला

Jitendra Awhad | सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जेष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ महाराष्ट्राच्या राजकारणाचा…
Read More