उद्योग, व्यवसायात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न – बाळासाहेब थोरात

उद्योग, व्यवसायात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न - बाळासाहेब थोरात

पुणे : उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी लागणाऱ्या परवान्याची संख्या कमी करण्यासोबतच उद्योग, व्यवसायात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

येरवडा येथे मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशनच्यावतीने कोरोना कालावधीत तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, सिम्बॉयसिसच्या संचालिका विद्या येरवडेकर, मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मराठा आंत्रप्रिनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश आसबे, सचिव सागर तुपे, संग्राम देशमुख आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे, असे सांगून श्री. थोरात म्हणाले, सहकार क्षेत्रामुळे बँकिंग, सहकारी साखर कारखाने, दुधसंघ, पतसंस्थाचे जाळे ग्रामीण भागात वाढले त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांची कौटुंबिक अर्थव्यवस्था सुधारली आहे. त्याप्रमाणे उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही अशीच प्रगती व्हावी यासाठी या क्षेत्रात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक परवान्याची संख्या तसेच इतरही बाबतीत सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून काम सुरू आहे. ऑनलाईन सातबारा, ऑनलाइन फेरफार, ई-पीक पाहणी याबरोबरच अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी शासन काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, सिम्बॉयसिसच्या संचालिका विद्या येरवडेकर,मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

https://www.youtube.com/watch?v=GmVj7hqrh5o&t=1s

Previous Post
#ShivsenaCheatsMumbaikar ट्रेंड ट्विटर ट्रेंडिंगमध्ये!

#ShivsenaCheatsMumbaikar ट्रेंड ट्विटर ट्रेंडिंगमध्ये!

Next Post
समीर वानखेडे एक प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करत होता - नवाब मलिक

समीर वानखेडे एक प्रायव्हेट आर्मी चालवून दहशत निर्माण करत होता – नवाब मलिक

Related Posts
लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य सुखाला पानिपतमधून अटक, सलमानच्या घराची केली होती रेकी

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य सुखाला पानिपतमधून अटक, सलमानच्या घराची केली होती रेकी

हरियाणा आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बिष्णोई टोळीतील  (Lawrence Bishnoi Gang)सुखा कलुया नावाच्या सदस्याला पानिपत येथून अटक करण्यात…
Read More
एकेकाळी यशाच्या शिखरावर होते 'हे' 10 बॉलीवूड सेलेब्रिटी, नंतर काहींना मागावी लागली भीक तर काहींनी केली चोरी

एकेकाळी यशाच्या शिखरावर होते ‘हे’ 10 बॉलीवूड सेलेब्रिटी, नंतर काहींना मागावी लागली भीक तर काहींनी केली चोरी

Bollywood Celebrities Riches To Rags: बॉलीवूडच्या दुनियेत एखादा रातोरात प्रसिद्धीच्या पायऱ्या चढतो. मात्र भविष्यात तो तितक्याच वेगाने खालीही…
Read More
काश्मीरमध्ये कुटुंबासह सुट्टी घालवायला गेलेल्या सुशीलचा मृत्यू, मुलीलाही गोळ्या घातल्या

काश्मीरमध्ये कुटुंबासह सुट्टी घालवायला गेलेल्या सुशीलचा मृत्यू, मुलीलाही गोळ्या घातल्या

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam terrorist attack) मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांपैकी एक असलेल्या सुशील नथानिएल…
Read More