Govt scheem : मध उत्पादन केंद्र कसं सुरु कराल? सरकारची मदत कशी मिळवाल ? 

योजनेचे स्वरुप व उद्दिष्ट:

  • मध संचालनालयामार्फत मध उद्योग सुरू करण्यासासाठी विविध ठिकाणांचा सर्व्हेक्षण करणे.
  • लाभार्थीची निवड करून त्यांना निवासी मोफत प्रशिक्षण देणे.
  •  तांत्रिक सहाय्य करून वसाहतीचा पुरवठा करणे तसेच मधुबन, मधुकेंद्र स्थापन करून विस्तारविषयक कामे करणे.
  • उत्पादित मधाची व मेणाची हमी भावाने खरेदी करणे.
  • मधावर प्रक्रिया करून मध ॲगमार्क करून विक्री करणे.
  •  मधमाशांना उपयुक्त वनस्पतींची लागवड करण्याविषयी मधपाळांना प्रवृत्त करणे.

मधकेंद्र योजनेची वैशिष्ट्ये

  • मधमाशा संरक्षण-संवर्धनासाठी जनजागृती व प्रसार-प्रचार
  • निःशुल्क प्रशिक्षण व कौशल्य विकास
  • ५० टक्के अनुदानावर साहित्य वाटप
  • उत्पादित मधाची मंडळामार्फत खरेदी हमी
  • उपउत्पादने तयार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण व ५० टक्के अनुदानावर साहित्य
  • मंडळातर्फे उपउत्पादनांच्या खरेदीची हमी
  • विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा

मधकेंद्र चालक पात्रता

  • किमान १० वी उर्तीर्ण
  • वय २१ वर्षांपेक्षा अधिक.
  • स्वमालकीची अथवा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या मालकीची अथवा भाडेतत्वावर उपलब्ध किमान एक एकर शेतजमीन

मधपाळ पात्रता

  • साक्षर असावा.
  • वय १८ वर्षापेक्षा अधिक.

प्रशिक्षण अभ्यासक्रम

  • प्रगतशील मधपाळ प्रशिक्षण- अभ्यासक्रम कालावधी २० दिवस.
  • मधपाळ प्रशिक्षण- अभ्यासक्रम कालावधी १० दिवस.
  • मधमाशापालन व्यवसाय छंद प्रशिक्षण ५ दिवस.

माहितीसाठी संपर्क जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय, २४-ब, मुंबई-पुणे रस्ता, शासकीय दूध डेअरी समोर, पुणे- (दू.क्र.०२० -२५८११८५९)