Govt Scheme : संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कसा घ्यावा ? 

योजनेचे लाभार्थी – 
वय वर्ष १८ पर्यंतची अनाथ मुले, १८ ते ६५ वर्षे वयाच्या विधवा, निराधार, परित्यक्त्या, घटस्फोटीत महिला, ३५ ते ६५ वर्षे वयाच्या अविवाहित  महिला, ० ते ६५ वर्षे वयाचे दिव्यांग (अंध, अस्थिव्यंग, मुकबधिर व मतिमंद) व दुर्धर आजार  ग्रस्त (उदा. एच.आय.व्ही, क्षयरोग, पक्षपात, कर्करोग, कुष्ठरोग) इत्यादींना लाभ देण्याची योजना आहे. (Govt Scheme: How to take advantage of Sanjay Gandhi Niradhar Yojana?)

योजनेच्या अटी
कौटुंबिक उत्पन्न २१  हजारापेक्षा कमी तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी कौटुंबिक उत्पन्न ५०  हजारापेक्षा कमी असावे लागते.

मिळणारा लाभ
लाभार्थ्यांना प्रतिमाह १  हजार रुपये अनुदान दिले जाते. विधवा परित्यक्त्या, घटस्फोटित  महिलेस अपत्य असल्यास दोन अपत्याच्या मर्यादेत अपत्ये ५  वर्षाची  होईपर्यंत प्रत्येकी १०० रुपये जादा अनुदान देण्यात येते. योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दाखले व प्रमाणपत्रासह अर्ज सादर करावा लागतो.

अधिक माहितीसाठी तहसील कार्यालयातील संबंधित शाखेत संपर्क साधावा