Govt Scheme : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम नेमका काय आहे ? 

योजनेचा उद्देश व स्वरुप
राज्यातील युवक, युवतींच्या सर्जनशिलतेला वाव मिळून स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे. त्याद्वारे ग्रामीण आणि शहरी क्षेत्रात सुक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस सहाय्य करणे.(Govt Scheme: What exactly is Chief Minister’s Employment Creation Program?)

लाभाचे स्वरुप
■ स्वगुंतवणूक ५ टक्के
■ देय अनुदान म्हजेच मार्जीन मनी- शहरी- २५ टक्के, ग्रामीण- ३५ टक्के
■ बँक कर्ज- शहरी ७० टक्के, ग्रामीण ६० टक्के

अटी व शर्ती

■ अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

■ किमान १८ ते ४५ वयोगट, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग, माजी सैनिक प्रवर्गासाठी ५ वर्षाची अट शिथिल.

■ १० लाख रुपयावरील प्रकल्पासाठी किमान ७ वी उत्तीर्ण

■ २५ लाख रुपयावरील प्रकल्पासाठी किमान १० वी उत्तीर्ण.

■ यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य, केंद्र शासन तसेच महामंडळांच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा.

■ पती पत्नी पैकी केवळ एकाच कुटुंबातील व्यक्तीस या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क

शहरी भागासाठी: जिल्हा उद्योग केंद्र

ग्रामीण भागांसाठी: १. जिल्हा खादी व ग्रामोद्योग कार्यालय, २. जिल्हा उद्योग केंद्र

अधिक माहितीसाठी: https://maha-cmegp.gov.in/homepage

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे