Govt Scheme : जननी सुरक्षा योजना काय आहे? या योजनेचा लाभ कसा मिळवावा ? 

योजनेचे स्वरुप
ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या पात्र कुटुंबातील माता मृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे. शासकीय आरोग्य संस्था, मानांकित खाजगी आरोग्य संस्थेत प्रसुतीला प्रोत्साहन देणे.

लाभार्थ्यास देण्यात येणारे लाभ

• ग्रामीण भागातील लाभार्थीस प्रसुतीनंतर ७०० रुपयांचा लाभ.
• शहरी भागातील लाभार्थीस प्रसुतीनंतर ६०० रुपयांचा लाभ.
• दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील लाभार्थीची प्रसुती घरी झाल्यास ५०० रुपयांचा लाभ.
• खासगी आरोग्य संस्थेत सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्यास १ हजार ५०० रुपयाचा लाभ.

आशा कार्यकर्तीस देण्यात लाभ
• ग्रामीण भागातील लाभार्थीला शासकीय अथवा खाजगी मानंकित आरोग्य संस्थेत प्रसुती करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल प्रती लाभार्थी ६०० रुपये
• ग्रामीण भागातील लाभार्थीला शासकीय अथवा खाजगी मानंकित आरोग्य संस्थेत प्रसुती करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल प्रती लाभार्थी ४०० रुपये

अधिक माहितीसाठी सपंर्क
• ग्रामीण भागात- उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, जिल्हा स्त्री रुग्णालये
• शहरी भागात- वैद्यकीय महाविद्यालये, नगरपालिका व महानगरपालिकांकडील नागरी आरोग्य केंद्रे, नागरी कुटुंब कल्याण केंद्रे व इतर रुग्णालये आणि शासन अनुदानित रुग्णालये.
• जननी सुरक्षा योजनेकरिता मानांकित केलेली खाजगी रुग्णालये.