Mahesh Landge | समाविष्ट गाव चऱ्होली येथील चव्हाणनगर येथे तक्षशिला बुध्दविहार आहे. या ठिकाणी सभामंडप उभारावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांची होती. त्यानुसार, या कामाला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
तक्षशिला बुद्ध विहार, चर्होली बु॥ (चव्हाण नगर) आणि भिमराज ग्रुप यांच्या मागणीनुसार, भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या पुढाकाराने सदर सभामंडप कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक विकास डोळस, सामाजिक कार्यकर्ते सचिन तापकीर, अजित बुर्डे, प्रविणभाऊ काळजे, अतुल काळजे,भाऊ रासकर, सुनिल तापकीर, सुनिल काटे, विनोद डोळस, राहुल लांडगे, जगन्नाथ चव्हाण, अक्षय चव्हाण, प्रशांत चव्हाण, संदीप चव्हाण, सचिन चव्हाण, अभिजित चव्हाण, अर्जुन चव्हाण, बबन चव्हाण, बाजीराव चव्हाण, सुयोग चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, राजू चव्हाण, रत्नेश चव्हाण, ज्ञानदीप चव्हाण, संतोष भोसले, प्रविण गायकवाड, आकाश कांबळे, वाघेश्वर थोरे, राजेश थोरात, अशोक शिंदे, रत्नाकर तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तक्षशिला बुद्धविहार या ठिकाणी सभामंडप उभारण्याबाबत स्थानिक नागरिकांची सूचना केली होती. त्यानुसार सुमारे ४ हजार ५०० चौरस फुटाचा सभामंडप उभारण्याचे काम सुरू केले आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील स्थानिक नागरिक, सोसायटीधारक यांच्या विविध घटकांतील नागरिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक पाठपुरावा करीत आहोत. सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या शाश्वत विकाससाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल; राहुल गांधींचं भाष्य
अमित शहांकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली का? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं
रायगडात महायुतीमधील वाद चिघळणार ? शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने