खेड येथील हुतात्मा राजगुरु स्मारकाला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा द्या;विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

मुंबई – देशाच्या स्वातंत्र्य(Freedom) लढ्यात हुतात्मा शिवराम हरी राजगुरु (Martyr Shivram Hari Rajguru) यांचे योगदान(contribution) मोठे आहे. खेड (जि. पुणे) येथे हुतात्मा राजगुरु यांच्या असलेल्या जन्मस्थळाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्मारकाला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतीकारकांनी बलिदान दिले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे बलिदान(Sacrifice) तर खूप मोठे आहे. नवीन पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे मूळगाव असणाऱ्या खेड (जि. पुणे) येथे त्यांच्या जन्मस्थळाला स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र हे स्मारक दुर्लक्षित झाले आहे. या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे अधिकार केंद्रसरकारला आहेत. तरी राज्यसरकारने पाठपुरावा करुन हुतात्मा राजगुरु यांच्या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याची मागणी अजित पवार यांनी केली.