Vijay Wadettiwar | मुंबईत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. रात्रीपासून मुंबईत 300 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसाने मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून विविध सखल भागात पाणी साचल्याने मुंबईची तुंबई झाल्याचे चित्र आहे. पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील नालेसफाई कामाची पाहणी केली होती. यावेळी नालेसफाईच्या कामाचा आढावा घ्यायला जाताना एकनाथ शिंदेंसाठी ग्रीन कार्पेट टाकण्यात आले होते. तरीही पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याने विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्मंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांसाठी ग्रीन कार्पेट, मुंबईकरांसाठी जिकडे तिकडे चिखल! ग्रीन कार्पेट टाकून नाले सफाई कामाची पाहणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पहिल्याच पावसाने त्यांच्या कामाची पावती दिली आहे. केंद्रापासून मुंबई महानगरपालिका पर्यंत यांचीच सत्ता आहे. तरी सुद्धा पहिल्याच पावसात मुंबई यांनी तुंबून दाखवली, अशी टीका त्यांनी ट्विटर पोस्टद्वारे केली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Union Budget | संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून,’या’ दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार
Supriya Sule | भाजप म्हणजे भ्रष्टाचार जुमला पार्टी आहे ;सुप्रिया सुळे यांचा आरोप
Nana Patole | नरेंद्र मोदी देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार, वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ