शॉकिंग! गुजरातमध्ये मतमोजणी केंद्रातच काँग्रेसच्या उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न

Gujrat Election Result 2022: गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा विजयी पताका झळकावण्याच्या वाटेवर आहे. आतापर्यंत भाजपाने १५५ जागांचे बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे काँग्रेसची अवस्था मात्र दयनीय असून त्यांची सध्या केवळ २१ जागांवर आघाडी आहे. हा धक्का सहन न झाल्याने मजमोजणी केंद्रावरच काँग्रेसच्या एका उमेदवाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गुजरातच्या विधानसभेत भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळताना दिसत आहे, त्यामुळे भाजपाचा विजय जवळपास निश्चित आहे. या विरोधात काँग्रेसचे गांधीधाम सीटचे उमेदवार भरत सोलंकी यांनी भाजपावर गंभीर आरोप करत मतमोजणी केंद्रावरच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भाजपाने थेट ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप भरत सोलंकी केला. तसेच त्यांनी आपल्या गळ्याला गळफास बांधून मतमोजणी केंद्रात आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु आसपासच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. या संपूर्ण घटनेमुळे काही वेळ मतमोजणी केंद्रात तणाव निर्माण झाला होता.