गुजरात विजय हा २०२४ लोकसभा निवडणुकीतील मोदींच्या विजयाचा पाया ?

Nagpur – गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला अद्वितीय विजय हा देशाचे दिशादर्शक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाचा पाया आहे, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली आहे.(Gujarat victory is the foundation of Modi’s victory in 2024 Lok Sabha elections)

गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकहाती सत्ता मिळवित विजयाच्या परंपरेत नवा इतिहास रचला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संविधानाला अनुसरून देशाची सुरू असलेली वाटचाल, देशात सुरू असलेले जनहिताचे कार्ये, यामुळेच जनतेने आपल्या मतांच्या रुपात देशाच्या विकासाला नवी देण्याच्या उद्देशाने ही विजयाची भेट दिली आहे.

गुजरातमधील हा विजय २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सत्ता स्थापनेच्या दृष्टीने सुरू असलेल्या वाटचालीचा पाया आहे, असेही ॲड. मेश्राम म्हणाले.