‘शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी आम्ही गद्दारी केली’, गुलाबराव पाटलांची कबुली

जळगाव- उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गटाकडून वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) ४० आमदारांना गद्दार म्हणून संबोधले जात आहे. आता यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मोठे भाष्य केले आहे. जळगावातील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याचे कारण सांगितले आहे.

होय आम्ही गद्दारी केली, पण एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री व्हावा यासाठी, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी कबुली दिली आहे. एकनाथ शिंदे मराठा आहे, त्यांच्यासाठी मी हा त्याग केला, गद्दारी केली असे गुलाबराव म्हणाले. आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो, यातच मतदारसंघाचा जयजयकार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

आम्ही मराठा मुख्यमंत्री केला मी वेडा आहे का? असा सवाल त्यांनी केला. जे टीका करता त्यांना माझे आव्हान आहे. शरद पवार, शरद पवार काय करतात, मग एकनाथ शिंदे कोण आहे?  एक मराठा चेहरा मुख्यमंत्री आम्ही केला. त्यासाठी  मी गद्दारी केली. त्यामुळे आपल्या मतदार संघाचा जयजयकार झाला, असेही त्यांनी शेवटी म्हटले.