चुना कसा लावतात हे अजून राऊतांना माहित नाही, वेळ येईल तेव्हा चुना लावेन – गुलाबराव पाटील

गुवाहाटी – महाराष्ट्रात सुरू असलेली राजकीय कोंडी आणखी वाढली आहे. एकीकडे गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीहून गोव्यात येण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला विधानसभेत बरेच काही सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढत आहेत. त्याचबरोबर अपक्ष आमदारही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जाताना दिसत आहेत.

या सर्व घडामोडी घडत असताना  संजय राऊतांच्या टीकेवर शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. आमची परिस्थिती काहीच नव्हती. तरीही आम्हाला सर्वकाही मिळालं. शिवसेनेच्या आशीर्वादाने हे सर्व मिळालं. त्यात आमचाही त्याग आहे. आम्ही आमच्या घरावर तुळशी पत्रं ठेवली. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत.

संजय राऊत म्हणतात मला टपरीवर पाठवू. त्यांना चुना कसा लावतात ते माहित नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा चुना लावू, अशी टीका त्यांनी केली. गुलाबराव पाटील हे जळगावात पानटपरीवर बसायचे. त्यांना शिवसेनाप्रमुखांनी वर आणलं, त्यांनी आपल्याशी गद्दारी केली. त्यांना पुन्हा टपरीवर बसायला नाही लावलं तर नाव बदलून ठेवा, असं राऊत म्हणाले होते.