चहापेक्षा किटली गरम; गुलाबराव पाटील यांची आदित्य ठाकरेंवर टीका

 मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपने एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारने सोमवारी विधानसभेत बहुमताचा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने जिंकला. यानंतर अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी विरोधकांवर प्रहार केला.

गुलाबराव पाटलांनी  आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. चहापेक्षा किटली गरम, असं म्हणत त्यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला. चार लोकांच्या कंडोळ्यानं उद्धव साहेबांना बावळट केलं, चार मतं घ्यायची लायकी नाही याची आणि आम्हाला डुक्कर बोलतात, हे कोण सहन करणार आहे !, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.

आम्ही बंड केलं नाही. आम्ही उठाव केला आहे. आम्ही बंड बिलकूल केलं नाही. हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत होऊ नये म्हणून आम्ही हे केलं. गुलाबराव तुला टपरीवर पाठवील. धिरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे हा इतिहास आहे. मुख्यमंत्रीही रिक्षा (Rickshaw) चालवायचे हा इतिहास आहे. ज्याला काही काम नव्हतं अशा नेतृत्वाला बाळासाहेबांनी निवडून आणलं. आमच्या प्रारब्धात बाळासाहेबांनी लिहिलं एक दिवस तुम्ही आमदार व्हा. आम्ही शिवसेना सोडली नाही. त्यामुळे आमच्या निवडून येण्याची चिंता काळजी करू नका.