धमक्या आम्हालाही देता येतात; गुलाबरावांचा थेट आदित्य यांनाच इशारा

मुंबई : एकनाथ शिंदे (Ekanat Shinde) आणि भाजपने एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारने सोमवारी विधानसभेत बहुमताचा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने जिंकला. यानंतर अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या खास शैलीत भाषण केले.

आम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सोडली याचं आम्हालाही दुःख आहे.पण आमचं घर जळत आहे. आमच्या घरातील लोक जळत आहे. आम्ही ते उध्वस्त होऊ देणार नाही. लोकांना मान्य असलेला निर्णय आम्ही केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिला निवडणुकीत शिवेसना (Shivsena) चौथ्या क्रमांकावर गेली. कोणाला काळजी आहे ? चार लोकांच्या कोंडाळ्यामुळे उद्धव ठाकरे हे असे वागतात. शिवसेनेची सत्ता गेली तरी आमच्या साऱ्यांना व्हॅल्यू (Value) नाही.

ज्यांची लायकी नाही निवडून यायची ते आमच्यावर बोलतात. आम्हाला डुक्कर (Pig) बोलतात. अशा लोकांसोबत आम्ही कसे राहणार ? एका मंत्र्याला भेटायला गेलो तर फोटो काढायची विनंती केली. पण त्या मंत्र्याने फोटोही काढू दिला नाही, अशी आठवण त्यांनी या वेळी सभागृहात सांगितली.

तुम्ही गटार आहात, वरळीतून (Worli) जाऊ देणार नाही, असे म्हणतात. पण त्याची काळजी करू नका. धमक्या आम्हालाही देता येतात, असा थेट इशारा गुलाबराव यांनी दिला. आम्ही 20 आमदार उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो होतो. ज्यांना जायचे त्यांना जाऊ दे, असे तेव्हा ते म्हणाले होते. ही नाराजी आजची नाही. आमदाराची नाराजी कोरोना काळापासून होती. कोणा आमदारेचेही फोन उचलले जात नव्हते, असे गुलाबरावांनी सांगितले.