“देवेंद्रजी I Live You…”, गुणरत्न सदावर्तेंनी माध्यमांसमोर दिली फडणवीस यांच्यावरील प्रेमाची कबुली

Nagpur: नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विरोधकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात केल्या गेलेल्या कामकाजांवर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या या कार्यशैलीची भाजपा नेत्यांकडून तोंडभरून प्रशंसा होत आहेत. अशातच एका प्रसिद्ध व्यक्तीने माध्यमांसमोर खुलेआम फडणवीस यांच्यावरील प्रेमाची कबुली दिली आहे.

प्रसिद्ध वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपले असीम प्रेम असल्याचे म्हटले आहे. त्यांनी माध्यमांसमोरच फडणवीस यांना आय लव्ह यू म्हटले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “मी नेहमीच देवेंद्रजींना आय लव्ह यू म्हणेन. लव्ह मॅरेज मी जयश्री पाटील यांच्यासोबत केलंय. पण नेता म्हणून मी फडणवीसांना आय लव्ह यू म्हणेन.” त्यांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. शिवाय राज्यभरातले नेटकरी त्यावर विविध प्रकारच्या गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.