शरद पवारांना कष्टकऱ्यांचा छळ पाहायचाय – गुणरत्न सदावर्ते

मुंबई : इतिहासातील सर्वाधिक काळ सुरु असलेल्या एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १४ हजार गाड्या स्थानक आणि आगारात उभ्या आहेत. दोन हजार गाड्यांच्या माध्यमातून राज्यात केवळ दहा टक्के एसटी फेऱ्या सुरू आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. कारण आजही या याचिकेवर सुनावणीला कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा तापला होता.

त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड.गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया देत महाईकास आघाडी सरकारवर घणाघात केला आहे. सरकार उच्च न्यायलयात उघडं पडलं, उद्धव ठाकरे आज उघडं पडले, प्रशासन उघड पडलं. न्यायालयानं स्वत: हेरलं, रिपोर्ट आहे तर मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय कुठंय, जो अभिप्राय न्यायालयासमोर ठेवण्यात आला त्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी नव्हती. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी नसल्यानं ते सरकारच्या वकिलांची भांबेरी उडाली , त्यानंतर वेळ द्या वेळ द्या असं म्हटलं. सरकारनं रिपोर्ट देऊ नका असं सांगितलं. आम्ही महाभारतातले संजय नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला माहिती नाही. शरद पवारांना कष्टकऱ्यांचा छळ पाहायचाय. असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला आहे.