“पुण्यातील बंद आणि मोर्चा बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा”, गुणरत्न सदावर्तेंची मागणी

पुणे- महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत बेताल वक्तव्ये करणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व भाजपा नेत्यांविरोधात आज पुण्यात बंदची (Pune Band) हाक पुकारली गेली आहे. पुणे शहर आज कडकडीत बंद राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आप व इतर सामाजिक संघटनांकडून मुक मोर्चाही (Silent March In Pune) काढण्यात आला आहे. या मुक मोर्चाला हजारोंच्या संख्येत लोकांनी हजेरी लावली. भाजपाचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले हेदेखील या मोर्चात सहभागी झाले आहे.

परंतु पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaranta Sadavarte) यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या अटकेची मागणी केली आहे. टीव्ही९ मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.

सर्वोच्च न्यायलयाने अनेकदा सांगितलं आहे की बंद बेकायदेशीर आहेत, असं असताना आज हा बंद पुकारण्यात आलाय. कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम सुरू आहे. हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करण्यात यावी, असं सदावर्ते म्हणालेत.

जॉइन करा आझाद मराठीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप