‘जिल्हा परिषद शाळेतली मुलगी ट्विटर किंवा गुगलची मुख्य कार्यकारी अधिकारी होईल तेंव्हा खरा आनंद’

'जिल्हा परिषद शाळेतली मुलगी ट्विटर किंवा गुगलची मुख्य कार्यकारी अधिकारी होईल तेंव्हा खरा आनंद'

मुंबई : गुगल, मायक्रोसॉफ्ट,आयबीएम, पाठोपाठ आता आणखी एका बलाढ्य टेक कंपनीच्या सीईओपदाची धुरा भारतीयाकडे सोपविण्यात आली आहे. ट्विटरच्या सीईओपदी पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पराग अग्रवाल हे आयआयटी मुंबईचे इंजिनिअर आहेत. गेल्या दशकभरापासून ते ट्विटरमध्ये कार्यरत आहेत. सध्या पराग अग्रवाल हे ट्विटरमध्ये चीफ टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. याआधी पराग अग्रवाल यांनी मायक्रोसॉफ्ट,याहू मध्ये देखील काम केले आहे.पराग अग्रवाल आयआयटी मुंबईमधून पदवीधर आहेत.

ट्विटरचे (Twitter) नवीन CEO अग्रवाल 2011 मध्ये कंपनीत सामील झाले आणि ऑक्टोबर 2017 पासून त्यांनी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम केले आहे, जेथे ते नेटवर्कच्या तांत्रिक धोरणासाठी जबाबदार होते. अग्रवाल यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणकशास्त्रात पीएचडी केली आहे. डॉर्सी यांनी कंपनीचे सीईओ पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्विटरच्या शेअर्समध्ये सुमारे 11 टक्के वाढ झाली.

दरम्यान, पराग अग्रवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसऱ्या बाजूला मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी एक लक्ष्यवेधी ट्वीट केले आहे. ते म्हणाले, जेंव्हा आमच्या मराठवाड्यासारख्या भागातल्या जिल्हा परिषद शाळेतली एखादी मुलगी ट्विटर किंवा गुगलची मुख्य कार्यकारी अधिकारी होईल तेंव्हा खरा आनंद.. असं ट्वीट केले आहे.

Previous Post
देवकीबाई बोबडे हत्याकांडाचा अखेर झाला पर्दाफाश; आरोपीला अटक झाल्यावर सर्वांनाच बसला धक्का

देवकीबाई बोबडे हत्याकांडाचा अखेर झाला पर्दाफाश; आरोपीला अटक झाल्यावर सर्वांनाच बसला धक्का

Next Post
RCB

दिग्गज खेळाडूंना डच्चू; रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ‘या’ तीन खेळाडूंना केलं  रिटेन

Related Posts
जातीयवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवार दिसला असता - पडळकर

जातीयवादाचा चेहरा असता तर सेम टू सेम रोहित पवार दिसला असता – पडळकर

Gopichand Padalkar Criticize Rohit Pawar: नगरमधील ओबीसी मेळाव्यात ओबीसी नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्य सरकार आणि…
Read More
'मुर्ख आहेत ती लोकं जी भुतांना घाबरतात', भूल भुलैया 3 चा टीझर रिलीज | Bhool Bhulaiya 3 Teaser

‘मुर्ख आहेत ती लोकं जी भुतांना घाबरतात’, भूल भुलैया 3 चा टीझर रिलीज | Bhool Bhulaiya 3 Teaser

हॉरर कॉमेडीच्या सध्याच्या क्रेझमध्ये, ‘भूल भुलैया 3’ हा ( Bhool Bhulaiya 3 Teaser) देखील 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी…
Read More
महात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार; भिडेंच्या वक्तव्याने नवा वाद

महात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार; भिडेंच्या वक्तव्याने नवा वाद

अमरावती : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे…
Read More