नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सुंदर जागा शोधताय? भारतातील ‘ही’ ठिकाणे बनवतील तुमचं New Year खास

मुंबई – नवीन वर्षाचे (New Year) स्वागत करण्यासाठी सर्वजण तयार झाले असून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक प्लान बनवले जात आहेत. जर तुम्हीही कुठेतरी फिरायला जाऊन नवीन वर्षाचे (Happy New Year 2023) स्वागत करणार असाल तर आम्ही तुम्हाला काही अशा जागा सांगणार आहोत, जिथे जाऊन तुम्ही नवीन वर्षाचे धमाकेदार असं स्वागत करू शकता. भारत हा एक असा देश आहे, जिथे तुम्हाला प्रेक्षणीय आणि हृदयस्पर्शी दृश्ये पाहायला मिळतील. तुम्ही तुमच्या न्यू इयर सेलिब्रेशनसाठी (New Year Celebration) भारतात सुंदर जागा शोधत असाल तर तुमच्याकडे अनेक आश्चर्यकारक पर्याय आहेत. (New Year Places To Visit)

जोधपूर
ऐतिहासिक ठिकाणांबद्दल (Historical Place) जाणून घेणे ही तुमची आवड असेल, तर तुम्ही राजस्थानच्या भव्य रिसॉर्ट्सला जाऊ शकता. जिथे प्राचीन वारशाचे साक्षीदार असलेले उंच किल्ले आणि हवेल्या तुमचे नवीन वर्ष संस्मरणीय बनवण्यात प्रभावी ठरतील. तुम्ही जोधपूर (Jodhpur) हा पर्याय निवडल्यास, उम्मेद भवन पॅलेस म्युझियम, उम्मेद उद्यान, उदय मंदिर आणि मंडोरे गार्डन येथे जाऊ शकता. याशिवाय पॅलेस ऑन व्हील्समध्येही तुम्ही प्रवास करू शकता. जे दिल्लीहून जयपूर, जोधपूर, जैसलमेर, सवाई माधोपूर, उदयपूर, चित्तोड, भरतपूर आणि आग्रा असा आठ दिवसांत प्रवास करते. संस्थानांच्या काळापासून चालत आलेल्या संस्कृतीची झलक पाहण्यासाठी तुम्ही या ट्रेनमध्ये प्रवास केलाच पाहिजे.

गोवा
गोवा (Goa) हे असे ठिकाण आहे, जिथे प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी भेट देण्याचा विचार करतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला अनेक रोमँटिक आणि मनमोहक दृश्ये पाहायला मिळतील. गोव्याची राजधानी पणजीजवळील मिरामा बीच येथे संध्याकाळी सूर्यास्त पाहणे तुमचे नवीन वर्ष संस्मरणीय बनवेल. डोना पॉला, कलंगुट, अंजुना आणि बोगा याशिवाय अनेक समुद्रकिनारे पाहण्यासारखे आहेत.

औली
काही ऑफबीट आणि अद्वितीय ठिकाणांपैकी, औली (Auli) शीर्षस्थानी आहे. आजूबाजूला बर्फाच्छादित पर्वतांचे दर्शन तुम्हाला स्की सारखे साहस करायला भाग पाडू शकते. येथे जगातील सर्वात उंच औली सरोवर खूप सुंदर दिसत आहे, तुम्ही तिथे काही वेळ आरामात उभे राहून तो क्षण फोटोंमध्ये कैद करू शकता. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर गुरसो बुग्यालच्या रहस्यमय मार्गांवर ट्रेक करा.

जम्मू आणि काश्मीर
काश्मीरचे (Jammu-Kashmir) नाव ऐकले की मनात रोमान्स हा शब्द येतो. एकीकडे फुलांनी सजलेली बोट हाऊस तुम्हाला दल सरोवरात बोलावत आहे, तर दुसरीकडे बाजारपेठांची गजबज तुम्हाला त्याकडे खेचत आहे. जर तुम्ही इथे येण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम दल लेकची रोमँटिक शिकारा राइड घ्या. मग गुलमर्गमधील जगातील सर्वात उंच गोल्फ कोर्सचा आनंद घ्या. पटनीटॉपच्या उंच टेकड्यांनाही भेट दिली पाहिजे. जर तुम्ही अशा जोडप्यांपैकी एक असाल ज्यांना शांततेत राहायला आवडते, तर तुमच्यासाठी काश्मीर हे योग्य ठिकाण आहे.

लक्षद्वीप
लक्षद्वीप (Lakshadweep) हे केरळच्या किनार्‍यापासून सुमारे 200 ते 300 किमी अंतरावर अरबी समुद्रात 36 बेटांची साखळी आहे. नारळाच्या झाडांनी भरलेल्या या हनिमून डेस्टिनेशनमध्ये मिनिकॉय बेट, पिट्टी पक्षी अभयारण्य, काल्पेनी बेट, अगत्ती बेट, कावरत्ती बेट, सागरी संग्रहालय, बंगाराम बेट, आंद्रेट्टी बेट, कदम बेट आणि अमिनदिवी बेट यांचा समावेश आहे.लक्षद्वीपमध्ये तुम्ही स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, पॅराग्लायडिंग आणि क्रूझ राईडचा आनंद घेऊ शकता. या सर्व ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही ट्रेन आणि विमानाची मदत घेऊ शकता. आणि लक्षद्वीपला जाण्यासाठी कोचीहून बोटीने जाता येते.