गचाळ कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्या, रहाणे आणि पुजाराला बीसीसीआयने दिला मोठा झटका

मुंबई – अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना BCCI च्या (क्रिकेट बोर्ड ऑफ इंडिया) ताज्या केंद्रीय करार यादीत खालच्या श्रेणीत हलवण्यात आले आहे ज्याला बोर्डाच्या सर्वोच्च परिषदेने बुधवारी मान्यता दिली.

BCCI ग्रेडच्या चार श्रेणी आहेत ज्यात ‘A+’ मधील खेळाडूंना 7 कोटी रुपये, तर A, B आणि C श्रेणींमध्ये अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी रुपये दिले जातात. यानुसार पुजारा आणि रहाणे यांना खराब फॉर्ममुळे आता बी ग्रेडमध्ये हलवण्यात आले आहे जे आधी ए ग्रेडमध्ये होते. या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतूनही वगळण्यात आले आहे.

सर्वात मोठी घसरण दुखापतग्रस्त अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या ग्रेडमध्ये होती, जो यादीत ग्रेड ए वरून थेट सी श्रेणीत ढकलला गेला. वादग्रस्त यष्टीरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहालाही कसोटी संघातून वगळण्यात आले आहे, त्याला बी श्रेणीतून क श्रेणीत हलवण्यात आले आहे पण तरीही त्याला एक कोटी रुपये मिळतील.