आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी मुंबई इंडियन्सने मजबूत संघ तयार केला आहे. एमआयच्या संघात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि ट्रेंट बोल्टसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. लिलावादरम्यान मुंबईने विल जॅकला विकत घेतल्यानंतर आकाश अंबानी आरसीबी व्यवस्थापनाशी हस्तांदोलन करायला गेला होता. आकाश अंबानी, नीता अंबानी आणि संघाचे सपोर्ट स्टाप एमआयच्या लिलावाच्या टेबलावर बसलेले दिसले, परंतु या टेबलवर उपस्थित नसतानाही हार्दिक पंड्याने खेळाडूंच्या खरेदीत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्या लिलावाच्या विषयावर बोलत आहे. तो म्हणाला, “मी टेबलावर बसलेल्या व्यवस्थापनाच्या संपर्कात होतो. मला माहित होते की आम्ही कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार आहोत आणि मला विश्वास आहे की आम्ही लिलावात खूप चांगली टीम तयार केली आहे.”
आम्ही एक उत्तम संघ तयार केला आहे…
ट्रेंट बोल्टच्या मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना हार्दिक पंड्या म्हणाला, “आम्ही एक उत्तम संघ तयार केला आहे, ज्यात अनुभवी खेळाडूंसोबतच तरुण उत्साही खेळाडूंचाही समावेश आहे. ट्रेंट बोल्ट परतला आहे, दीपक चहर देखील सामील झाला आहे. आता विल जॅक, रॉबिन मिन्झ आणि रायन रिकेल्टन सारखी तरुण प्रतिभा संघासोबत जोडली गेली आहे.” संघाशी संबंधित युवा अनकॅप्ड खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करताना हार्दिक म्हणाला की, त्यांना प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करावा लागेल.
हार्दिक पांड्या कर्णधार असेल
ऑक्टोबर महिन्यात, जेव्हा सर्व 10 संघांनी आयपीएल 2025 साठी त्यांची कायम ठेवण्याची यादी जाहीर केली, तेव्हा एमआयने एकूण 5 खेळाडूंना कायम ठेवले होते. त्यात जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांना स्थान देण्यात आले आहे. त्याचवेळी, एमआयच्या व्यवस्थापनाने जाहीर केले होते की आयपीएल 2025 मध्ये हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहील. त्याला एमआयने 16.35 कोटी रुपयांना कायम ठेवले होते.