काँग्रेस सगळ्यात मोठा जातीयवादी पक्ष ! हार्दिक पटेलचं टिकास्त्र

अहमदाबाद – काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर एका दिवसानंतर पाटीदार अनामत आंदोलन समिती (PASS) नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी जुन्या पक्षावर टीका केली आणि त्याला जातीयवादी म्हटले. गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना हार्दिक पटेलने काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर अनेक आरोप केले.

पक्षाला जातीयवादी ठरवून ते म्हणाले की, गुजरातच्या विकासासाठी आपल्याकडे कधीच दूरदृष्टी (Vision) नव्हती, उलटपक्षी पक्षाचे नेते नकारात्मकतेने भरलेले आहेत.जातीचं राजकारण (Caste politics) सोडलं तर काँग्रेसमध्ये काहीच होत नाही. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हे फक्त एकाच परिवाराभोवती फिरत असल्याचं हार्दिक पटेल म्हणाला.

हार्दिक पटेल म्हणाले, उद्योगपती हा स्वतःच्या मेहनतीने बनतो, जर उद्योगपतीने कष्ट केले तर त्याला सरकार मदत करत आहे, अशी बदनामी आपण करू शकत नाही. ते पुढे म्हणाले, काँग्रेसमध्ये (Congress) ना मला काम करण्याची संधी मिळाली, ना त्यांनी मला कधी काम दिले. आम्ही काम मागितल्यावर त्यांना अडचण आली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना हार्दिक पटेल म्हणाले , जेव्हा राजीनामा (Resigned) देण्याची वेळ आली तेव्हा मला हिंमत द्यायला हवी होती. काँग्रेसमध्ये राहून मी माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील तीन वर्षे वाया घालवली. पाटीदार समाजातील ज्येष्ठ नेते (Senior leaders of the Patidar community) आणि मित्रांनी मला काँग्रेसमध्ये दाखल होऊ नकोस म्हणून बजावलं होतं. परंतू त्यावेळी मी त्यांचं ऐकलं नाही. आज मला त्याचा प्रत्यय येतोय. म्हणूनच मी आज त्या सर्वांची माफी मागतो आहे, असंही हार्दिक पटेलने सांगितलं.