‘कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्णय म्हणजे जुन्या बॉटल मध्ये नवीन दारू’

'कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचा निर्णय म्हणजे जुन्या बॉटल मध्ये नवीन दारू'

पिंपरी – कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी असंघटित रिक्षा, टॅक्सी चालक,ट्रक चालक, यांच्यासाठी तामिळनाडूच्या धर्तीवरती कल्याणमंडळ स्थापन करण्यास परवानगी दिली असून कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी रिक्षा चालक व त्यांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा न करता एकतर्फी चुकीचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे रिक्षा टॅक्सी चालक मालकांचे मोठे नुकसान होणार असून, रिक्षा व टॅक्सी चालकांची फसवणूक असून, हसन मुश्रीफ यांच्या या निर्णयाला आम्ही तीव्र विरोध करणार असून पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणेसह महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे,

बाबा कांबळे म्हणाले रिक्षा , टॅक्सी चालक हा स्वयं रोजगार करणार असून त्यास कामगार म्हणता येणार नाही , रिक्षा चालकांचे सर्व कामकाज परिवहन विभाग अंतर्गत करण्यात येत असून, लायसन्स बॅच, परवाना, परिवहन विभाग देत आहे , यामुळे परिवहन विभाग अंतर्गत रिक्षा , टॅक्सी चालक मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी आमची मागणी आहे, परंतु कामगार मंत्री हसन मुश्रीफ मात्र कामगार विभाग सोडून परिवहन संबंधित असलेल्या विभागात वरती अतिक्रमण करत आहे,

कामगार विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या असंघटित कामगारांन साठी स्थापन झालेल्या मंडळातील कामगारांना अजून ते न्याय देऊ शकले नाही कामगार विभागाकडे यापूर्वी असलेलं घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ, बांधकाम कामगार कल्याण मंडळ, सुरक्षा रक्षक मंडळ यांना न्याय देण्यास व त्यांचे प्रश्‍न सोडवण्यास कामगार विभाग आपयशी झालेला आहे, हसन मुश्रीफ कामगार मंत्री झाल्यापासून या घटकांचे कोणतेही प्रश्न सुटले गेले नाहीत असंघटित कामगारांना साधे सामाजिक सुरक्षा देखील देण्यात आली नाही, मंग आता कामगार मंत्री हसन मुश्रीफ हे रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची घोषणा करून त रिक्षा, टॅक्सी चालकांना न्याय कसा देणार अशा प्रश्न आहे.

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी अगोदर घरेलू कामगार, बांधकाम मजुरांचे प्रश्न सोडवावेत, रिक्षाचालक मालकांचे प्रश्नांचा फार कळवळाआहे असा भास निर्माण करू नये, हसन मुश्रीफ यांचा रिक्षा कल्याणकारी मंडळाची मान्यता देणे म्हणजे जुन्या बॉटल मध्ये नवीन दारू असल्याचा हा प्रकार आहे यापूर्वी देखील अनेक वेळा तामिळनाडूच्या धर्तीवरती कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे परंतु तो निर्णय फसलेला आहे पूर्वीच्या कामगार मंत्र्यांनी देखील असे निर्णय घेतले आहेत तो निर्णय का फसला याचा अभ्यास हसन मुश्रीफ यांनी केलेला दिसत नाही असे यावेळी बाबा कांबळे म्हणाले.

हे ही पहा:

https://www.youtube.com/watch?v=uS6auH2ZXZ8

Previous Post
अभिषेक विचारेंच्या 'द गर्ल हू गॉट लेबल्ड'ला वाचकांची पसंती...

अभिषेक विचारेंच्या ‘द गर्ल हू गॉट लेबल्ड’ला वाचकांची पसंती…

Next Post
'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर रंगणार गाण्यांची मैफल... !

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर रंगणार गाण्यांची मैफल… !

Related Posts
देशमुख आणि मुंडे कुटुंब यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही - Supriya Sule

देशमुख आणि मुंडे कुटुंब यांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – Supriya Sule

Supriya Sule | मी ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि खुनाचे आरोप केले. त्याविरोधात राजकीय नैतिकतेच्या आधारावर सगळे पक्ष एकत्र…
Read More

“लव्ह यू बेबी, मी नेहमीच तुझ्या पाठीशी” वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंड अर्जुनच्या मलायकाला प्रेमळ शुभेच्छा

Malaika Arora Birthday: अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malika Arora) एकमेकांना ३ वर्षांपासून डेट करत आहेत.…
Read More

महाराष्ट्र सदनातील महापुरुषांचे पुतळे हटवून कार्यक्रम घेणे ही घटना मनाला दुःख देणारी – छगन भुजबळ

नाशिक :- महाराष्ट्रात सदनात जयंती साजरी करायला माझा विरोध नाही. परंतु याठिकाणी शिवराज मुद्रा लावली आहे ती झाकून…
Read More