‘वो तेरे प्यार का गम! अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची झलक पाहिलीत का?

Mumbai – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis ) यांचं ‘वो तेरे प्यार का गम! (Woh Tere Pyar Ka Gham) हे नवं सॅड साँग(New sad Song) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 19 जुलै रोजी हे गाणं रिलीज होणार आहे. will be here to break our hearts all over again on असं कॅप्शन देत अमृता फडणवीस यांनी हा टिजर शेअर केला आहे.

अमृता फडणवीस यांनी याचं पोस्टर रिलीज केल्यानंतर या गाण्याची झलक दाखवणारा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अमृता फडणवीस यांच हे पहिलंच गाणं असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली. गाण्याचा छोटासा व्हिडिओ शेअर करत लवकरच संपूर्ण गांण युट्यूब वर रिलीज होणार असल्याची घोषणा अमृता फडणवीस यांनी सोशल मिडीयावरील पोस्ट द्वारे केली आहे.

‘लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना. लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना .!’असे कॅप्शन देत अमृता फडणवीस यांनी या गाण्याचे पोस्टर सोशल मिडीयवर शेअर केला आहे. यावेळी अमृता फडणवीस यांनी सारेगम या म्युझिक कंपनीचे आभार देखील मानले आहेत.