Sanjay Kapoor | त्याने माझी फसवणूक केली, मुलीखातर मला..; संजय कपूरच्या पत्नीचा खुलासा

महीप कपूरला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलण्यासाठी ओळखले जाते. महीप या मॉडेलने संजय कपूरसोबत (Sanjay Kapoor) लग्न केले आहे. ती तिची मुलगी शनाया कपूरच्या पदार्पणाच्या तयारीत आहे. झूमला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने संजयच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल आणि तो शनायाचा कठोर पालक कसा आहे याबद्दल उघडपणे भाष्य केले.

महीप कपूरने संजय कठोर पिता का आहे याचा खुलासा केला
संजय (Sanjay Kapoor) किंवा तुझ्यापैकी सर्वांत कठोर पालक कोण आहे, असा प्रश्न विचारला असता महीपने क्षणाचाही विलंब न करता संजयचं नाव घेतलं. “संजय मुलांप्रती कठोर आहे. यामागचं कारण मला असं वाटतं की, त्याने अनेक महिलांना डेट केलंय. त्याने हे जे काही केलंय, त्यामुळे तो त्याच्या मुलीबद्दल अधिक घाबरून आहे. हे सत्य आहे. तो शनायाबाबत वेडा होईल. माझ्या मुलाबाबत त्याला इतकी भीती नाही. पण शनायाबाबत मला त्याला सांगावं लागतं की जरा शांत हो. मग मला समजलं की तो असा विचार करत असेल की एखाद्या मुलाने तिच्यासोबत तेचं केलं तर काय होईल? तो वडील म्हणून खूप कठोर आहे पण हळूहळू तो जरा शांत होतोय”, असं तिने सांगितलं.

2022 मध्ये नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजमध्ये संजय कपूरच्या फसवणुकीबाबत महीप म्हणाली होती, “माझ्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात संजयने नात्यात माझी फसवणूक केली. तेव्हा मी शनायाला घेऊन बाहेर पडले. मी स्वत:साठी तो निर्णय घेतला होता. पण माझ्या हातात नुकतीच जन्मलेली मुलगी होती. एक महिला म्हणून आणि एक आई म्हणून मी मुलीला प्राधान्य दिलं. माझ्या मुलीला वडिलांचं प्रेम मिळावं ही भावना मनात होती. जर मी त्यावेळी हे नातं मोडलं असतं तर मी आयुष्यभर पश्चात्ताप केला असता. कारण आता जेव्हा माझी मुलं माझ्या घरी येतात, माझा पती जेव्हा घरात येतो, तेव्हा त्यांच्यासाठी ती जागा सर्वांत सुंदर असते. ती शांतता अनुभवणं त्यांची गरज आहे आणि तीच शांतता संजय मलाही देतो.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप