हेडफोनमध्ये मोठ्या आवाजात गाणे ऐकल्याने फक्त बहिरेपणाच नव्हे तर हार्ट अटॅक आणि कँसरचाही धोका!

Health Tips: आजकाल ऑटो असो, बस असो किंवा मेट्रो असो, प्रत्येक व्यक्तीने कानात इअरफोन (Earphone) किंवा हेडफोन (Headphone) घातलेले आढळतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की, हेडफोनवर बोलताना किंवा संगीत ऐकताना आपले हात मोकळे राहतात. परंतु हेडफोनचे तोटे देखील खूप गंभीर आहेत हे तुम्हाला माहिती नाही. इअरफोन घातल्याने तुमच्या कानावर वाईट परिणाम होतोच, शिवाय तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचते.

हेडफोनचा सतत वापर केल्याने अनेक आजार जडतात. हेडफोनच्या अतिवापरामुळे श्रवणशक्ती कमी होणे, बहिरेपणा, निद्रानाश, डोकेदुखी या प्रमुख समस्या आहेत, याशिवाय काहीवेळा ते जीवघेण्या अपघातांचे कारणही ठरते. चला जाणून घेऊ हेडफोन किंवा इअरफोन (Headphones Side Effects) वापरण्याचे तोटे… (Listening To Loud Music On Headphone Or Earphone Can Cause Serious Illness)

बहिरेपणा
हेडफोनच्या अतिवापरामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. जास्त वेळ इअरफोनद्वारे गाणी ऐकल्याने व्यक्तीचे कान सुन्न होऊ शकतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, इयरफोनच्या जास्त वापरामुळे कान वाजणे, चक्कर येणे, झोप न लागणे, डोके आणि कानात दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. आपल्या कानांची ऐकण्याची क्षमता फक्त 90 डेसिबल आहे, जी हळूहळू 40-50 डेसिबलपर्यंत कमी होते, त्यामुळे बहिरेपणाच्या तक्रारी उद्भवतात. इअरफोनमध्ये उच्च डेसिबल लहरी असतात, ज्याच्या वापरामुळे तुम्ही तुमची ऐकण्याची क्षमता कायमची गमावू शकता.

संसर्गाची शक्यता
हेडफोनमध्ये मोठ्या आवाजात संगीत ऐकताना खूप मजा येते, परंतु ही मजा तुमच्यासाठी शिक्षा ठरू शकते. तुम्हीही ऑफिस किंवा घरी गाणी ऐकत असताना इअरफोन्स एकमेकांशी शेअर करत असाल तर असे करणे टाळा. असे केल्याने तुमच्या कानात संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो. जास्त वेळ इअरफोनद्वारे गाणी ऐकल्यानेही कानाला संसर्ग होऊ शकतो. जेव्हा तुम्ही कोणाशी इयरफोन शेअर कराल तेव्हा ते सॅनिटायझरने स्वच्छ करा.

मानसिक समस्या
जर तुम्हीही मोठ्या आवाजात संगीत ऐकत असाल तर त्यामुळे मानसिक समस्या उद्भवू शकतात. यासोबतच हृदयविकार आणि कर्करोगाचा धोकाही वाढतो. म्हणूनच डॉक्टर हेडफोनवर कमी आवाजात संगीत ऐकण्याची शिफारस करतात.