Hug Day: मिठी मारणं आहे हृदयासाठी फायदेशीर, तणावही होतो दूर; Hug करण्याचे आश्यर्यकारक फायदे वाचा

Hug Benefits: प्रेम व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी हातात हात घेऊन प्रेम व्यक्त करतं, कोणी मिठी मारून तर कोणी किस करून प्रेम दाखवतात. जोडीदाराला मिठी मारणे ही केवळ एक सुंदर भावना नाही तर भावना व्यक्त करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. कधी कधी ज्या भावना शब्दांत मांडता येत नाहीत, त्या प्रेमाने मिठी मारून व्यक्त करता येतात. एखाद्याला मिठी मारणे केवळ चांगली भावनाच देत नाही तर त्याचे आरोग्याला अनेक फायदे देखील होतात.

होय, मिठी मारल्याने शरीराला अनेक फायदे होतात आणि ते कोणते, याचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.

१. तणाव दूर होतो- अभ्यासानुसार, एखाद्या खास व्यक्तीला मिठी मारल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी कमी होते. मिठी मारल्याने तणाव दूर होतो, तसेच माणसाची स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते. म्हणूनच आनंदाच्या किंवा खास क्षणी तुमच्या जोडीदाराला किंवा मित्रांना मिठी मारा.

२. मूड सुधारतो- संशोधनानुसार मिठी मारल्याने मूड फ्रेश राहतो. वास्तविक, जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता तेव्हा तुमचा मेंदू जास्त प्रमाणात सेरोटोनिन हार्मोन तयार करतो, ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. याशिवाय मिठी मारल्यानंतर काम करण्याची क्षमताही वाढते.

३. हृदयासाठी फायदेशीर- मिठी मारल्याने शरीरात लव्ह हार्मोन ऑक्सीटोसिनची पातळी वाढते. यामुळे हृदय निरोगी राहते. एवढेच नाही तर मिठी मारल्याने रक्तदाबही कमी होतो. एका अभ्यासानुसार, जे लोक अनेकदा आपल्या जोडीदाराला मिठी मारतात, त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.

४. मानसिक आरोग्य चांगले असते- जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला नेहमी मिठी मारत असाल किंवा तो तुम्हाला नेहमी मिठी मारत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही दोघेही प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना पूर्ण पाठिंबा देता. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते.