तुम्हालाही वारंवार ढेकर येतेय? ‘ही’ असू शकतात त्यामागची कारणे, उपायही घ्या माहिती करुन

ढेकर येणे (Burping), ही एक सामान्य गोष्ट आहे. हा कोणत्याही प्रकारचा आजार नाही. ढेकर आल्याने पोटातील गॅस बाहेर पडतो, त्यामुळे पोटफुगीचा त्रास होत नाही. पण जर तुम्ही खूप ढेकर देत असाल किंवा वारंवार ही समस्या उद्भवत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरजेचे आहे. हे पचनाच्या समस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. चला तर मग जाणून घेऊया जास्त ढेकर येण्याची कारणे कोणती आहेत आणि त्यापासून सुटका कशी मिळवायची?

जास्त ढेकर येण्याची कारणे (Excessive Burping Causes)
– जेवताना बोलणे
– जलद जलद खाणे
– चहा, कॉफी किंवा सूप सुर्र आवाज करत पिणे
– स्ट्रॉ च्या साहाय्याने पेये घेणे
– मान वर करून बाटलीतून पाणी पिणे
– सतत च्युइंगम खाणे

काही खाण्यापिण्यामुळेही जास्त ढेकर येऊ शकते. यामध्ये मुळा, कोबी, फ्लॉवर, वाटाणे, लसूण, कांदे, केळी, फ्रेंच बीन्स, कडधान्ये आणि राजमा यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय कोल्ड ड्रिंक्स किंवा सोडा ड्रिंक्स पिणे किंवा अल्कोहोलचे अतिसेवन केल्यानेही जास्त प्रमाणात गॅस बनते आणि ढेकर येते.

ढेकर येण्याची समस्या कशी दूर करावी? (Cure On Excessive Burping)
– अन्न चावून चावून खा.
-जेवताना बोलू नका.
– कोल्ड्रिंक्स, सोडा पेय आणि अल्कोहोल इत्यादी घेऊ नका.
– पिण्यासाठी स्ट्रॉ वापरू नका.
– तुमच्या पचनाशी संबंधित समस्या ओळखा आणि त्या दूर करा.

ढेकर जास्त येत असेल आणि पोट जास्त फुगले असेल तर डाव्या बाजूला झोपल्याने आराम मिळतो. गुडघे छातीजवळ आणूनही गॅस बाहेर पडतो. काही गोष्टी खाल्ल्याने किंवा पिण्यामुळे ढेकर जास्त येत असेल तर ते ओळखण्याचा प्रयत्न करा. याशिवाय कोणत्याही तणावामुळे विशिष्ट वेळी ढेकर येत असल्यास डॉक्टरांना सांगा. जेणेकरून वेळेत समस्या ओळखून त्यावर उपचार करता येतील.