अंडे न खाता प्रोटीन मिळवायचे असेल तर ‘हे’ ५ शाकाहारी पदार्थ खा, सोयाबीन आणि छोले यादीत

प्रथिने (Protein) हा संतुलित आहाराचा अत्यावश्यक भाग आहे. प्रथिने आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. तसेच स्नायू आणि हाडे मजबूत करण्याचे काम करतात. कारण प्रथिनांच्या सेवनाने तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही आणि ऊर्जाही मिळते, त्यामुळे वजन कमी करण्यातही ते उपयुक्त ठरते. बहुतेक लोक प्रथिनांसाठी अंड्यांवर अवलंबून असतात, तर अनेक शाकाहारी पदार्थ देखील प्रथिनांनी भरलेले असतात. चला जाणून घेऊया या पदार्थांबद्दल…

1. सोयाबीन
अनेकांना सोयाबीनची चव आवडत नाही. मात्र, सोयाबीन हे वनस्पती-आधारित प्रथिनांच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. USDA नुसार, 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये 36 ग्रॅम प्रथिने असतात, जे अंड्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतात. प्रथिनांच्या चांगल्या प्रमाणासाठी, आठवड्यातून एकदा नक्कीच सोयाबीन खा.

2. चणे किंवा छोले
छोले हा पदार्थ जगभरात अनेक प्रकारे बनवला जातो. या प्रथिनेयुक्त पदार्थापासून विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जाऊ शकतात, जसे की चणा करी, छोले भटुरे किंवा सूप. छोले हे प्रथिनांचे उत्तम स्त्रोत असून 100 ग्रॅम चण्यामध्ये 19 ग्रॅम प्रोटीन असते.

3. कुट्टूचे पीठ
या पीठातही प्रथिने भरलेली असतात. या सुपरफूडचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात सहज करू शकता. त्यापासून तुम्ही पॅनकेक्स तयार करू शकता, त्यापासून ब्रेड देखील बनवू शकता. 100 ग्रॅम कूट्टूच्या पिठात 13.2 ग्रॅम प्रथिने असतात.

4. चिया बियाणे
चिया बिया हे लहान काळे बिया आहेत जे साल्विया हिस्पॅनिक वनस्पतीपासून येतात. हे त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आणि ओमेगा -3 साठी ओळखले जाते. एवढेच नाही तर चिया बियांमध्ये प्रथिनेही भरपूर असतात. 100 ग्रॅम चिया बियांमध्ये 17 ग्रॅम प्रोटीन असते. त्यापासून तुम्ही पुडिंग ते मिल्कशेक वगैरे बनवू शकता.

5. क्विनोआ
क्विनोआ (Quinoa) वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण तुम्हाला माहित आहे का की ते संपूर्ण प्रोटीन देखील मानले जाते, कारण त्यात सर्व 9 आवश्यक अमीनो ऍसिड असतात. 100 ग्रॅम क्विनोआमध्ये 16 ग्रॅम प्रोटीन असते.

(सूचना- लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)