खरच शिलाजीत नपुंसकता दूर करण्यात मदत करते? जाणून घ्या शिलाजीतशी संबंधित सर्व सत्य

शिलाजीतचे नाव ऐकताच तरुणांमध्ये विविध प्रकारचे विचार येऊ (Myth about shilajit) लागतात. पुरुषही शिलाजीतबद्दल अनेक प्रकारे कल्पना करू लागतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की शिलाजीत पुरुषांसाठी वियाग्रासारखे काम करते. काही लोकांच्या मते शिलाजीत घेतल्याने खूप शक्ती मिळते, तर काही लोकांच्या मते शिलाजीतचे अनेक तोटे आहेत. शिलाजीतबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. जर तुमच्याही मनात असे गैरसमज असतील, तर जाणून घेऊया शिलाजीतबद्दल काय काय दंतकथा (समज) आहेत? (Shilajit misconception)

वास्तविक, शिलाजीतचा औषधी वापर भारतात 5000 वर्षांहून अधिक काळापासून केला जात आहे. हे हिमालयात 18000 फूट उंचीवर आढळते. शिलाजीत त्याच्या शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. शिलाजीत प्रजनन क्षमता वाढवते पण ते वियाग्रासारखे काम करत नाही. हिंदुस्तान टाईम्स न्यूजमध्ये, तज्ञांनी शिलाजीतबद्दलचा समज उघड केला आहे.

शिलाजीत बद्दल समज
हिंदुस्तान टाईम्सच्या न्यूजनुसार, कपिवा येथील संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख डॉ. कीर्ती सोनी यांनी शिलाजीतशी संबंधित काही मिथकांचा पर्दाफाश केला आहे.

1. शिलाजीत वियाग्रासारखे काम करते
शिलाजीत हे वियाग्रासारखेच (वियाग्रा एक टॅबलेट असून ती नपुंसकत्वाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी वापरली जाते) असते असा गैरसमज बहुतेकांचा असतो. डॉ कीर्ती सांगतात की, तसं अजिबात नाही. शिलाजीत पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवते, पण शिलाजीत हे वियाग्राप्रमाणे अजिबात काम करत नाही. शिलाजीत हा वियाग्रा चा पर्याय असू शकत नाही. डॉक्टरांनी सांगितल्यावरच शिलाजीतचे सेवन करा. डॉक्टरांच्या सल्ल्याविना त्याचे सेवन केल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.

2. फक्त कच्चा शिलाजीत शुद्ध आहे
शिलाजीत कच्च्या स्वरूपात शुद्ध आहे, असा लोकांच्या मनात गैरसमज आहे. वास्तविकता अशी आहे की शिलाजीतच्या कच्च्या स्वरूपात सेवन केल्याने विषारी पदार्थ देखील पोटात जाऊ शकतात. शिलाजित हे पर्वत खडकांपासून मिळते. म्हणूनच कच्च्या शिलाजितमध्ये शिसे, कॅडमियम, आर्सेनिक इत्यादी हानिकारक घटक आढळतात. म्हणूनच शिलाजीतला संशोधित केले जाते.

3. शिलाजीतचे नियमित सेवन हानिकारक आहे
काही लोकांचा असा विश्वास आहे की शिलाजीतचे नियमित सेवन हानिकारक आहे, परंतु तसे अजिबात नाही. शिलाजीत हे एक उत्तम पूरक आहे जे ऊर्जा प्रदान करते. शिलाजीतचे इतरही अनेक शारीरिक फायदे आहेत पण डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याचे सतत सेवन केले जाऊ शकते.

4. उन्हाळ्यात शिलाजीतचे सेवन करू नये
शिलाजीतचा प्रभाव अतिशय उष्ण असतो, त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन करू नये, असे अनेकांचे मत आहे. तर हिवाळा असो की उन्हाळा, डॉक्टरांच्या देखरेखीखाली कधीही शिलाजीतचे सेवन करावे. तथापि, पचनाच्या तक्रारी असलेल्यांनी उन्हाळ्यात फारच कमी शिलाजीत घ्यावे. शीलाजित शरीराला उबदार ठेवण्यासाठी हिवाळ्यात वापरणे चांगले आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की उन्हाळ्यात याचा वापर करू नये.