राज्याच्या ‘या’ भागात होऊ शकतो आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

पुणे – राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी इथं 46 पूर्णांक 2 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, नागपूर, वर्धा, महाबळेश्‍वर आणि सातारा इथं काल मध्यम ते जोरदार पाऊस झाला.राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात 12 जून पर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकणात दक्षिण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. विदर्भात काही भागांत सोसाट्याचा वारा वाहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.पावसाळ्यात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर समुद्रामध्ये 26 वेळा मोठं उधाण येणार असल्याची माहिती प्रादेशिक बंदर विभागानं दिली आहे.