अनिल बोंडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर हेमंत देसाईंची भाजपवर टीका

मुंबई – भाजपने (Bjp) वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी (Rajya Sabha) उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपने माजी मंत्री कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) आणि मोदी सरकारमध्ये विद्यमान मंत्री असलेल्या पियूष गोयल (Piyush Goyal) यांच्यासह धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी राज्यसभेची निवडणूक आता रंगतदार होण्याची शक्यता आहे.

देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.

दरम्यान, बोंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर  जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई (Hemant Desai) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, शरद पवारांचे (Sharad Pawar) वाईट दिवस सुरू झाले आहेत… हातावर हात देऊन बसाल, तर तुमच्या लेकीबाळींवर हिजाब घालण्याची वेळ येईल… अन्यथा गटविकास अधिकाऱ्याला फटके मारू… असे वादग्रस्त उद्गार अनिल बोंडे यांनी वेळोवेळी काढले होते. नाना पटोले (Nana Patole) यांचा पंजा छाटला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच नायब तहसीलदारांना शिवीगाळ आणि मारहाण केल्यावरून त्यांना शिक्षाही झाली होती. एवढे अचाट कर्तृत्व गाजवलेल्या माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. खरोखरच देश और भाजप बदल रहा है…