‘कोणताही विचार न करता बिनडोकपणे वागून वारंवार तोंड फोडून का घेतले जात आहे?’ 

 मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध राणे कुटुंब असा सामना रंगला असताना आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नारायण राणेंचा बंगला (narayan rane house) पाडण्याचे आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सरकारचे वकील आशुतोष कुंभकोणी (aashutosh kumbhkoni) यांनी उच्च न्यायालयाला दिली. यामुळे राणेंच्या बंगल्यावरील कारवाई टळली आहे.

राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यात (Aadish bungalow ) अनाधिकृत बांधकाम केल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने राणे यांना तीन वेळा नोटीस देत अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात यावे; अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सांगितले हेाते. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. आता या प्रकरणी महापालिकेने माघार घेतली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई (Hemant Desai) यांनी पालिका आणि सरकार बाबत एक फेसबुक पोस्ट केली असून यात ते म्हणतात, ‘अधिश’वरील कारवाई मागे घेण्याची पाळी आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारची व पालिकेची शोभा झाली आहे! कोणताही विचार न करता बिनडोकपणे वागून वारंवार तोंड फोडून का घेतले जात आहे? की उभयपक्षी काही तडजोड झाली आहे? रोज सकाळी दहा वाजता बोलणारेही आज एकदम मौनात गेले आहेत. या मौनाची भाषांतरे कोण करणार!असं ते म्हणाले.