दिलगिरी मागितल्यानंतर देखील चंद्रकांतदादांवर शाईफेक होणे हे चुकीचेच; हेमंत देसाई यांची रोखठोक भूमिका 

मुंबई –   भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीमध्ये शाईफेक करण्यात आली आहे. पाटील यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही शाईफेक करण्यात आली आहे. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांकडून हे भ्याड कृत्य केलं गेल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली होती. पण त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे. त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आलीय.

दरम्यान,  या घडामोडींवर आता जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिलगिरी मागितल्यानंतर देखील चंद्रकांतदादांवर शाईफेक होणे हे चुकीचेच. त्याचा तीव्र निषेध! असं म्हणत त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.