उमेदवारी जाहीर होताच हेमंत रासने यांची डरकाळी;  म्हणाले,…

Pune Bypoll Election : कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु असताना विरोधकांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे.

यातच आता भाजपने देखील एक पाऊल पुढे टाकत आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली असून चिंचवडसाठी अश्विनी लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.(Ashwini Laxman Jagtap for Chinchwad and Hemant Rasane for Kasba Peth announced).

दरम्यान, उमेदवारी घोषित झाल्यानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणूक विक्रमी मतांनी भाजप जिंकणार, असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला आहे. खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक लढवली जाईल, असे रासने म्हणाले.कसब्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला केली होती. भाजप ही निवडणूक जिंकण्यास सक्षम आहे, असे रासने यांनी सांगितले.