मध्य वस्तीतील वाहतुकीची समस्या प्राध्यानाने सोडवणार- हेमंत रासने

पुणे: भारतीय जनता पक्ष+बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) + आर.पी.आय.+ शिवसंग्राम पक्ष+रा.स.प. महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक १८मध्ये आज पदयात्रा काढण्यात आली. यावेळी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी गुरुवारी पेठ शुक्रवार पेठ काची आळी येथे नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले की शहराच्या मध्यवर्ती भाग असल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी समस्या आहे  बाजारपेठ परिसर असल्याने येथे खरेदी साठी येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती ह्या साठी स्वयंचलित पार्किंग संकुल तयार करून तसेच रस्त्यावर ची अतिक्रमणे काढून त्यांचे पुर्नवसन इत्यादी उपयोजना करून वाहतुकीची समस्या कायमची सोडविण्याचा निर्धार या वेळी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केला.

या पदयात्रेत मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे,सरचिटणीस राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक आरती कोंढरे, अजय खेडेकर, विजयालक्ष्मी हरिहर, सम्राट थोरात, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे धनंजय जाधव यांच्या सह प्रभागातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपास्थित होते.