हिजाब प्रकरणी आज सुनावणी, अनेक जिल्ह्यांत कलम 144 लागू

कर्नाटक : हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच राज्यात आज शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ आज सकाळी हिजाबच्या मुद्द्याबाबत निकाल देणार आहे.

न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयाबुन्नेसा मोहिउद्दीन यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण निकालासाठी राखून ठेवले होते. उडुपी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर गर्ल्सच्या सहा विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश केला होता. त्यानंतर विरोध सुरु केला होता. हा विरोध इतर जिल्ह्यांमध्ये पसरला आणि मोठा वाद निर्माण झाला. काही हिंदू विद्यार्थी भगवी शाल घालून येऊ लागल्याने तणाव निर्माण झाला होता.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण उडुपी येथील एका महाविद्यालयापासून सुरू झाले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सहा मुली हिजाब परिधान करून वर्गात आल्या आणि प्रत्युत्तर म्हणून हिंदू विद्यार्थी भगवे उर्पण घालून महाविद्यालयात आले. हळूहळू हा वाद राज्याच्या इतर भागातही पसरला, त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव आणि अनेक ठिकाणी हिंसाचार झाला.